पंचायत समिती ,जव्हार
 

विभाग व योजना

सामान्य प्रशासन विभाग

माहिती

विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
विभागाचा ईमेल

सामान्य प्रशासन विभाग हा पंचायत समितीच्या प्रशासनातील महत्त्वाचा विभाग आहे. पंचायत समितीतील सर्व विभागांना आस्थापनात्मक मुद्दे, प्रकरणे इ. वर मार्गदर्शन सामान्य प्रशासन विभागामार्फत दिले जाते व सर्व विभागांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवले जाते. या विभागाचे कामकाज पूढील प्रमाणे-
आस्थापनात्मक
महाराष्ट्र विकास सेवा वर्ग – १ व वर्ग २ अधिकारी यांची आस्थापना. तसेच मा. गट विकास अधिकारी यांचे आदेशाने खातेप्रमुखांची आस्थापना सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. कक्ष अधिकारी / कार्यालयीन अधिक्षक / वि.अ.सां. सहा.सांख्यिकी यांची आस्थापना. तसेच कार्यालयीन आस्थापना / स्पर्धा परिक्षा घेणे / सेवा प्रवेशोत्तर परिक्षा घेणे. लघुलेखक / वरिष्ठ सहायक/कनिष्ठ सहायक यांची आस्थापना / अनुशेषाची माहिती.
वर्ग-४ कर्मचारी-परिचर कर्मचार्‍यांची आस्थापना व वाहन चालक यांची आस्थापना.
अनुकंपा प्रकरणे.
पदोन्नती –
पंचायत समितीकडे कार्यरत असणार्‍या कनिष्ठ कर्मचार्‍यांना शासनाच्या तरतूदींनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती पद असेल तेथे पदोन्नती देणे.
खातेनिहाय चौकशी –
(कर्मचारी कार्यरत असतांना त्यांचेकडे सुपूर्द केलेल्या कामामध्ये अनियमीतता, गैरव्यवहार वा अपहार यासारख्या गंभीर स्वरूपाच्या घटना गुन्हे घडतात अशावेळी त्याची पुनरावृत्ती होवू नये व प्रतिबंध बसावा आणि त्यातील सत्य-असत्यता पडताळून जबाबदारी निश्चित करणे व दोषी आढळलेल्या कर्मचार्‍यांना गुन्ह्याच्या गांभिर्यानुसार शासनाच्या तरतूदींनूसार शिक्षा निश्चित करणे).