जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण 70 कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर त्यापैकी 7000 हेक्टर भातपिकासाठी असून नागली-4900 हेक्टर, वरई-4300 हेक्टर, कडधान्य-2403 हेक्टर व गळीतधान्य- 843 हेक्टर क्षेत्र लावडी खाली आहे. तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी. इतके पर्जन्यमान असून तालुक्याची लोकसंख्या 1,40,187 आहे. त्यापैकी ग्रामीण- 1,28,147 व शहरी (नगरपरिषद-जव्हार)- 12040 इतकी आहे. तालुक्याचे ठिकाण जव्हार असून ते समुद्र सपाटी पासुन 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 2 ग्रामदान मंडळ, 48 ग्रामपंचायती असून 109 महसुल गावे त्यामध्ये 1 ओसाड गाव आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण 1,28,147 इतकी लोकसंख्या आहे. त्यामध्ये पुरुष- 63206 व स्त्रिया -64941 एवढी आहे. अनुसूचित जमाती लोकसंख्या- ग्रामीण-124259 व अनुसूचित जाती लोकसंख्या ग्रामीण- 516 इतकी आहे. जव्हार तालुक्याच्या पुर्वेस मोखाडा तालुका पश्चिमेला डहाणु तालुका, दक्षिणेला वाडा तालुका व उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा आहे. या तालुक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळ हे तिन्हीही ऋतू प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतात. या तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-याचा असल्याने या ठिकाणी भात, नागली, वरई ही प्रमुख पीके असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लावगवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमेटो, काजू, आंबा व तुती यांची लागवड केली जाते. या तालुक्यातुन मोगरा दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो. तालुक्यामध्ये खडखड धरण आहे. जव्हार शहरास एैतिहासिक वारसा लाभलेला असून जय विलास पॅलेस व शिरपामाळ व बोपदगड ही एैतिकासिक स्थळे आहेत. हनुमान पॉईंट-जव्हार, सनसेंट पॉईंट जव्हार, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, डोंबझरा ही पर्यटन स्थळे म्हणून ओळखली जातात. तसेच या तालुक्यात खंडोबा यात्रा जव्हार, विजयादशमी उत्सव जव्हार, शिवमंदिर यात्रा बाळकापरा व देवतळी यात्रा जामसर या ठिकाणी भरवली जातात. जव्हार तालुक्यामध्ये खंडेराव मंदिर जव्हार, हनुमान मंदिर जव्हार, राम मंदिर जव्हार, महादेव मंदिर जव्हार, अंबिका माता मंदिर जव्हार, शिवमंदिर बाळकापरा, राम मंदिर कडाचीमेट, विठठल मंदिर जव्हार, स्वामी समर्थ मंदिर जव्हार, शणी मंदिर जव्हार ही देवस्थाने आहेत. तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, महादेव कोळी, मल्हार कोळी हा आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणवर आहे. जगप्रसिध्द वारली पेटींग व देवदेवतांचे मुखवटे या तालुक्यातील रामखिंड या गावी तयार केले जातात.